Kasba Election | धंगेकारांच्या विजयावर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले..

Kasba Election | चिंचवड : अनेक दिवसांपासून राज्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे वारे वाहत होते. यावेळी कसब्यात रवींद्र धंगेकरांनी भाजप पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटतं होतं याच्या निषेधार्थ त्यांनी कसबा गणपती मंदिराजवळ उपोषण केलं. तसेच दुसऱ्या बाजूला चिंचवड येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी दिली आहे. अशातच धंगेकारांच्या विजयावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे : 

“आज कसब्या सारख्या ठिकाणी अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता होती. अशा ठिकाणी महविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. “महाराष्ट्रात जी गद्दारी झाली आणि जे वातावरण झालं ते कोणालाच आवडलं नाही.” अस देखील ते म्हणाले.

“कसब्या सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात हे होऊ शकतं” आदित्य ठाकरे : 

कसबा हा अनेक वर्षांपासून भाजपच्या हाती होता. यामुळे ते म्हणाले की; “३२ वर्षांनंतर ही जागा काँग्रेसच्या हाती आली आहे. यामुळे हे किती बोलकं असू शकत. हेच परिवर्तन महाराष्ट्र आणि देशात होणार” अस आदित्य ठाकरे पुढं म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed.