Kasba election | रवींद्र धंगेकरांचीआगेकूच; अभिजित बिचुकलेंना एवढी मत
Kasba election | Abhijit Bichukale | पुणे : कसबा आणि चिंचवड या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे वारे अधिक वाहत होते. यात एखाद्या चित्रपटासारखे ट्विस्ट घडताना पाहायला मिळत होते. आज मतमोजणी आहे. आज सर्व राज्याचं लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागलं आहे. कोण जिंकेल आणि कोणाचा पराभव होईल हे पाहण्याजोगे असणार आहे. यातच आता चिंचवड महायुतीच्या अश्विनी जगताप तसेच महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी जंग पहायला मिळत आहे. तर कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे हेमंत रासने यांच्यात लढत आहे. अशावेळी राज्यातील काही जनतेचे अभिजित बिचुकले यांच्याकडे देखील लक्ष लागले आहे.
कुणाला किती मते :
सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७ हजार ८४४ मते मिळाली. तर भाजपच्या हेमंत रासने यांना २ हजार ८६३ मत मिळाली. दुसरीकडे सदा चर्चेत असलेले अभिजित बिचुकले यांना केवळ ४ मते मिळाली आहेत. यामुळे राजकारणात हशा फुटला आहे.
रवींद्र धंगेकरांची आगेकूच :
रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपने पोलिसांना हाताशी घेऊन पैसे वाटले असा आरोप यांनी केला होता. त्यांनी याविरुद्ध उपोषण देखील केलं होत. याचाच परिणाम महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतांवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
- Pune By-Election | चिंचवड भाजप राखणार पण कसबा हातून जाणार??; स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल काय सांगतोय?
- Kasba Election | धंगेकरांचीआगेकूच; अभिजित बिचुकलेंना एवढी मत
- Kasba By-Election | 30 वर्षानंतर भाजपच्या हातातून कसबा निसटणार??; नवव्या फेरीत धंगेकर की रासने कोण आघाडीवर??
- Job Opportunity | कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग (CME) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Kasba By-Election | कसबा निकालाच्या पहिल्या फेरीत अभिजीत बिचुकले, आनंद दवेंना पडलेल्या मतांची चर्चा
Comments are closed.