Katrina Kaif | कतरिना कैफला जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
महाराष्ट्र देशा डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी विकीने मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी आणि कतरिनाला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विकी कौशलच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य राजपूत असे आरोपीचे नाव आहे. आरोपी कतरिना कैफचा सोशल मीडियावर स्टॉक करत होता आणि तिच्या पोस्टवर अश्लील कमेंट लिहीत होता. विकीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्याने विकी आणि कतरिनाला जीवे मारण्याची धमकी दिली. आता पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६(२) (धमकावणे) आणि ३५४(डी) (महिलेचा अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयटी अॅक्ट 67 अन्वये गुन्हाही दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, आरोपी कतरिना कैफला इन्स्टाग्रामवर स्टॉक करत होता आणि त्याने इंस्टाग्रामवरच तिला धमकीचा मेसेज पाठवला होता.
कतरिना कैफच्या आधी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानलाही एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मॉर्निंग वॉक दरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांना सलमान खान याच्या नावे लिहलेले एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये सलमानबरोबर सिद्धू मुसेवालासारखा प्रकार करण्याची धमकी देण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची टोळी बॉलिवूडमधील व्यक्तींकडून पैसे उकळण्यासाठी हे सगळं करत आहेत, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Anil Desai : धनुष्यबाण मिळविण्याच्या लढाईत आता अनिल देसाईंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Uddhav Thackeray : “भाजपाला एक तर शिवसेना संपवायचीय आणि ती संपवताना त्यांना ठाकरे…” ; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
- Abdul Sattar : “… तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला तयार”, अब्दुल सत्तारांच ठाकरेंना आव्हान
- Uddhav Thackeray : बंडखोरांनी आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन मत मागवीत, पण हे माझे वडीलही चोरायला निघालेत – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray : “हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत”; उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल
Comments are closed.