कतरिना कैफ लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफनं नुकताच ३८ वा वाढदिवस साजरा केला. कतरिना कैफ काही काळापासून अभिनेता विकी कौशलला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. काही वेळा कतरिनाला भेटून तिच्या आपार्टमेंटमधून निघत असताना विकीचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. मात्र अद्याप हे नातं दोघांनी जाहीर केले नाही.

कतरिनाच्या वाढदिवशी कॉस्ट्यूम डिझायनर अ‍ॅशले रिबेलोनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. अ‍ॅशले रिबेलोच्या या इन्स्टाग्राम स्टोरीवर वेडिंग गाऊनमध्ये कतरिना कैफ दिसत आहे. हा फोटो सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाच्या वेळचा आहे. हा फोटो शेअर करताना अ‍ॅशलेनं लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कतरिना. हा फोटो लवकरच खरा होऊ दे.’

अ‍ॅशले रिबेलोच्या या पोस्टनंतर कतरिनाच्या चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच लग्नच्या बेडीत अडकणार की काय? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेता हर्षवर्धन कपूरनं या दोघांच्या नात्यावर भाष्य करत हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा