छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल KBC चा माफीनामा

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. यामुळे अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागला. दरम्यान KBC मेकर्स आणि सोनी टीव्हीनं या प्रकरणी माफी मागितली आहे.

सोशल मीडियावरील विरोध पाहता केबीसी मेकर्सनी त्यांच्या आगामी एपिसोडमध्ये याबद्दल माफीचा स्क्रोल चालवला आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरून याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘बुधवारी केबीसीच्या एपिसोडमध्ये अनावधानाने छत्रपति शिवाजी महाराज यांचा एक त्रुटीपूर्ण पर्याय देण्यात आला होता. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. लोकांच्या भावनांचा विचार करुन आम्ही खेद व्यक्त करत आमच्या आगामी एपिसोडमध्ये माफीचा स्क्रोल चालवला आहे.’ त्यामुळे आता केबीसीच्या माफीनाम्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील याची उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.