Kedarnath Helicopter Accident | केदारनाथमध्ये भीषण अपघात, हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू

(Kedarnath Helicopter Accident) उत्तराखंड : उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. एका खासगी कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी दरम्यान येथे बचाव कार्य करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

मंगळवारी सकाळी 11.40 वाजता हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मृतांमध्ये तीन प्रवासी गुजरातमधील, एक कर्नाटक, एक तामिळनाडू आणि एक झारखंडचा आहे. पायलट हा मुंबईचा रहिवासी आहे. अपघाताचा तपास डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) आणि केंद्राकडे सोपवण्यात येणार आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये 6 जण प्रवास करत होते. खराब हवामान आणि धुक्यांमुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. केदारनाथमध्ये धुके पसरल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केलाय.

केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट असा रस्ता उपलब्ध नाही. त्यासाठी उत्तराखंड सरकारने काही दिवसांपूर्वीच, भाविकांना मंदिरापर्यंत जाता यावं यासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. यासाठी विविध कंपन्या एअर ट्रॅव्हल बुकिंगची सुविधा पुरवतात.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. उत्तराखंडमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेने व्यथित. या दु:खद प्रसंगी, आम्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. दरम्यान या घटनेचा सखोल तपस करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.