InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

३० वर्षांपूर्वीची उधारी चुकवण्यासाठी केनियाचे खासदार औरंगाबादेत

३४ वर्षांपूर्वी म्हणजे १९८५ मध्ये औरंगाबादेत केनियाचा एक तरुण शिक्षणासाठी आला होता. मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील वानखेडेनगरात एका घरात त्याने भाड्याने खोली घेतली. घरमालकाचे किराणा दुकानही होते. त्यांच्याकडून तो रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करत होता. शिक्षण संपल्यावर तो मायदेशी परतला. तेव्हा किराण्याचे २०० रुपये देणे राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. रक्कम स्वत:हून नेऊन दिली पाहिजे, असे त्याला सारखे वाटत होते. पण भारतात येण्याची संंधी नव्हती. पुढे हा तरुण केनियाच्या राजकारणात उतरला.

न्यारीबरी चाची मतदारसंघातून खासदार आणि पुढे केनियाच्या संरक्षण-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय समितीचा उपाध्यक्ष झाला. गेल्या आठवड्यात त्याला अचानक केनियन शिष्टमंडळासोबत भारत दौऱ्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदींची भेट झाल्यावर हा तरुण रविवारी (७ जुलै) औरंगाबादेत दाखल झाला. घरमालक-किराणा दुकानदारांचा शोध काढून त्याने त्यांना २०० रुपयांच्या मोबदल्यात २५० युरो डॉलर्स देत ऋण चुकवले. 

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply