Keshav Upadhey | “…पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या”, केशव उपाध्ये यांचे उद्धव ठाकरेंना सवाल
Keshav Upadhey | मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhey) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काही सवाल केले आहेत. याबाबतची फेसबुक पोस्ट देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत. जरूर जावे पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या, असं त्यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
यादरम्यान, चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या ८ कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. पुढे एक वर्ष उलटल्यानंतरही ही मदत मिळालीच नाही. तुमच्या पोकळ आश्वासनावर आपत्तीग्रस्तांनी आज प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार?, असा सवाल उपाध्ये यांनी केला याहे.
वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल, अशी घोषणा आपण गेल्या वर्षी २५ जुलै रोजी केली होती. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली?, असा घणाघात देखील त्यांनी केला.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा मुख्यमंत्री असूनही तुम्ही पुलावर अंथरलेल्या रेड कार्पेटवर उभे राहून मदतीची केवळ आश्वासने दिलीत. तेव्हा संकटात खचलेला शेतकरी पुढे वर्षभरात सावरावा यासाठी तुमच्या सरकारने काय केले? असा सवाल केशव उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
शेतकऱ्यांना वरदान ठरलेली जलयुक्त शिवार ही शेततळी योजना बंद करून शेतकऱ्याचे पाणी तोडल्यावर तुम्ही ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्याची घोषणा केली होती. पुढच्या दीड वर्षात या घोषणेचे कागदी घोडे कोणत्या बासनात बांधले? असा प्रश्न करत जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,००० देणार, फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल. असे २३ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर केले होते. दोन वर्षांनंतरही अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालीच नाही. याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यासमोर माफी मागणार का?, असा घणाघात देखील केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | “2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभाव होणार”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत
- Saamana | “शेतकऱ्यांनी गावं विकायला काढलीत, राज्यपालजी, आपल्याला माहितीय का?”, सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा
- Chandrashekhar Bawankule | “त्यांचे पक्ष तेच बुडवतील…”, चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेना अन् राष्ट्रवादीवर निशाणा
- Eknath Khadse | “मदत करायची नसेल तर..”; एकनाथ खडसेंचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हल्ला
- Kishori Pednekar | दिपाली सय्यद यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.