Keshav Upadhye | “नुसतंच माझे वडील, माझे आजोबा अन्…”; जलीलांचा तो व्हिडीओ शेअर करत भाजपची जहरी टीका
Keshav Upadhye | मुंबई : सध्या राज्याभरात धुलिवंदनाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेतेमंडळींनीही या सणाचा आनंद लुटत आहेत. सण कोणताही असो नेतेमंडळी आपले राजकीय रंग दाखवल्याशिवाय राहत नाहीत. एकीडकडे धुलिवंदन साजरी होत आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी आरोप-प्रत्यारोपांची उधळण करत असल्याचं पहायला मिळत आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी साखळी उपोषण सुरू केलं आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून जलील यांना लक्ष्य केलं जात असतानाच आता भाजपकडून जलील यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
इम्तियाज जलील यांची बाळासाहेब ठाकरेंवर टीका
इम्तियाज जलील यांच्या व्हिडीओमध्ये जलील यांनी थेट बाळासाहेब ठाकरे याच्यावर टीका केली आहे. त्याच व्हिडीओवरुन आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओसह केशव उपाध्येंनी केलेल्या ट्वीटमध्ये ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
Keshav Upadhye Criticize on Aaditya And Uddhav Thackeray
“बालासाहेब ठाकरे हौ कौन? काल परवाचंच इम्तियाज जलील (झलील) यांचं हे वक्तव्य. यावर आत्तापर्यंत ना उद्धव ठाकरे बोलले, ना आदित्य ठाकरे बोलले ना ठाकरे गटाचा कुठला नेता बोलला. नुसतं माझे वडील, माझे आजोबा असं म्हणून वारसा सिद्ध होत नसतो”, अशा शब्दांत केशव उपाध्येंनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
केशव उपाध्येंचं ट्वीट
बाळासाहेब ठाकरे है कौन? – MIM खासदार @imtiaz_jaleel
काल-परवाचंच इम्तियाज जलिल (झलील) यांचं हे स्टेटमेंट..
यावर आतापर्यंत ना @OfficeofUT बोलले ना @AUThackeray बोलले ना @ShivSenaUBT_ चा कुठला नेता बोलला..
नुसते माझे वडील, माझे आजोबा असं म्हणून वारसा सिध्द होत नसतो pic.twitter.com/ZHa1KhhOhj— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 7, 2023
उपाध्येंनी शेअर केलेला व्हिडीओत काय आहे?
इम्तियाज जलील औरंगाबादच्या नामांतरावरून सरकारवर टीका करताना दिसत आहेत. यावेळी जलील यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. “बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? ते असे कोण होते ज्यांचं स्वप्नं पूर्ण झालं आहे? भारतात काही मोजके लोक असे आहेत ज्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती. हे महोदय त्यांच्यातले एक होते. निवडणूक आयोगाने असे आदेश दिले होते की 6 वर्षं तुम्ही मत देऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे काही फार मोठे वगैरे नव्हते की त्यांचं स्वप्नं पूर्ण झालं असं म्हणाल. पण यांच्या खालच्या दर्जाच्या राजकारणामुळे तुम्हाला माझ्या शहराचं नाव बदलण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवाल इम्तियाज जलील विचारत असल्याचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Rahul Gandhi | “राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत म्हणूनच अविवाहित”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Devendra Fadnavis | “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”; फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला
- Shambhuraj Desai | छत्रपती उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात ‘पेटिंग’वरुन मोठा वाद; पोलीस बंदोबस्त तैनात
- Eknath Shinde | “अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
- Sandeep Deshpande | “मज्जा आहे बाबा एका माणसाची आता पंतप्रधान..”; संदीप देशपांडेंच्या ठाकरेंना खोचक शुभेच्छा
Comments are closed.