Keshav Upadhye | “बाळासाहेबांच्या नावाशिवाय स्वकर्तृत्वावर काहीच करता येत नाही त्यांनी…”; भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल

Keshav Upadhye | मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं. यावर आता अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) काल पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. यावेळी बोलताना आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढेल, असं आंबेडकरांनी सांगितलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचे तोंडभरून कौतूक केले. उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर आज भाजपा प्रवक्ते केशव (Keshav Upadhye) उपाध्ये यांनी टीका केली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय स्वत:च्या कर्तृत्वावर ज्यांना काहीच करता येत नाही, त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारणं हा एक मोठा विनोद आहे. उरला सुरला जो काही पक्ष आहे तो वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे.”

पुढे ते म्हणाले, “वैचारिक विरोधावर ज्यांचा विश्वास नाही आणि एकप्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा संभाजी ब्रिगेडसोबतही यांनी युती केली. नक्षलवाद्यांचं जे समर्थन करताय त्यांच्या सोबत ते जाताय. हिंदुत्व आणि या देशाची अस्मिता असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसमोर उद्धव ठाकरे यांनी गुडघे टेकले.”

“सत्तेसाठी राष्ट्रवादीसमोर स्वाभीमान सोडून दिला. ते  उद्धव ठाकरे आता लोकशाही वाचवण्याचा गप्पा मारता आहेत. उरलासुरला पक्ष वाचवण्यासाठीची त्यांची धडपड आहे. खरं म्हणजे त्यांच्या स्वत:च्या पक्षात तरी लोकशाही आहे का याचा विचार त्यांनी हे विधान करताना करायला हवा होता”, अशी टीका उपाध्ये यांनी यावेळी केलीय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.