Ketaki Chitale | “प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका”

 Ketaki Chitale | मुंबई : सगळीकडे दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं असल्याचं दिसून येतं आहे. तसेच या सणाच्या दिवसामध्ये सर्वसामन्य नागरिकापासून ते अभिनेत्यांपर्यंत सर्वांच्या घरात दिवाळी साजरी केली जाते.  सोशल मीडियावर (Social Meadia) अभिनेता-अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तर अशातच आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असेलली मराठमोळी अभिनेत्री (Actress) केतकी चितळे (Ketaki Chitale) हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

काय म्हणाली केतकी चितळे (Ketaki Chitale)

केतकीने शेअर केलेली पोस्ट दिवाळीसंबंधी असल्याचं समजतं आहे. त्यामध्ये तिने सर्वांना दिवाळीच्या (Diwali) शुभेच्छा दिल्या आहेत. केतकीने आपल्या पोस्टमधून शुभेच्छा देताना आपण जे इमोजी वापरतो ते चीनमध्ये नववर्षासाठी वापरला जातो. असे म्हटले आहे. त्यामुळे आपण तो वापरताना काळजी घ्यावी असं आवाहन केतकीनं सर्वांना केलं आहे.

यासोबतच केतकीने आणखिन एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका. आपण जेव्हा हॅप्पी लिहितो तेव्हा शुभेच्छा आणि हॅप्पी या दोन्ही शब्दांमध्ये खूप अंतर आहे हे समजून घेण्याची गरज आहे. असे काही करुन आपण आपल्या धर्मामध्ये अंतर निर्माण करु नये.

दरम्यान, केतकी चितने आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. काहीवेळा तिने केलेल्या पोस्टमुळे तिला सोशल मीडियावरही खूप ट्रोलही करण्यात आलं आहे. त्यामुळे दिवाळीला दिलेल्या शुभेच्छांना तिचे चाहते किंवा इतर लोक कशा प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.