सोनी मॅक्सवर ‘केजीएफ’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच

बाॅक्स आॅफिसवर 400 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवणारा केजीएफ: चॅप्टर वनचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आता लवकर प्रेक्षकांना वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 9 मार्च 2019 रोजी सोनी मॅक्सवर रात्री 8 वाजता हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

केजीएफ: चॅप्टर वन 21 डिसेंबर 2018 रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता. तसेच, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषेत देखील हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

कन्नड सुपरस्टार यश या चित्रपटात प्रुमख भूमिकेत आहे. तर प्रशांत नील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. केजीएफ: चॅप्टर टू देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.