“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

जळगाव : महाविकास आघाडीच्या तीनचाकी सरकारमधील नेत्यांच्यात चालू असणारा अंतर्गत कलह आता हळूहळू समोर येऊ लागला आहे. नाशिकनंतर आता जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद उफाळून आलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. एखादा शूटर लावून मला मारुन टाका, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

एका व्हायरल क्लिपवरुन एकनाथ खडसे यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. ऑडिओ क्लिपमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये, एकनाथ खडसे यांनी लेव्हल सोडल्यास मी देखील लेव्हल सोडून बोलेन. मी एकनाथ खडसे यांचा कधीही अनादर केला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी तोंडाला कुलूप लावावे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच व्हायरल ऑडिओ क्लीपसोबत खडसे माझं नाव जोडत आहेत. परंतु मी आणि माझे कुटुंब अगदी साधेपणाने जगतोय. खडसेंना माझ्याबद्दल काही वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे. मी आज देखील 10 वाजल्यानंतर घराला कुलूप लावून राहतो, ही परस्थिती आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा