InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

खडसेंना भाजपचा आणखी एक धक्का; महाजनांकडे पालकमंत्रिपद

- Advertisement -

मंत्रिमंडळ पुनरागमनाच्या आशेवर बसलेल्या एकनाथ खडसेंना भाजपकडून दिलासा मिळण्याऐवजी उलट धक्क्यांवर धक्के देण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे.

- Advertisement -

खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून जळगावचे पालकमंत्रिपद बाहेरच्या व्यक्तीकडेच होते. मंत्रिमंडळात पुनरागमन तर होईलच, शिवाय हातातून गेलेले पालकमंत्रिपदसुद्धा आपल्याला परत मिळेल, असे खडसे आणि त्यांच्या समर्थकांना वाटते. परंतु गिरीश महाजन यांनी नाशिकसोबत जळगावचे पालकमंत्रिपद आपल्याकडे घेऊन खडसेंच्या गटात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

कमी कालावधीसाठी का होईना, पण जळगाव जिल्ह्य़ाची सर्व सूत्रे हाती आल्याने जळगावसह संपूर्ण राज्यात महाजनांनी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.