InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

खप पंचायतीचा अजब निर्णय ; मुलीने मोबाईल वापरल्यास 1.5 लाख रुपयांचा दंड

- Advertisement -

खाप पंचायत, जात पंचायतींसारखीच गुजरातच्या ठाकोर समाजाने मनमानी सुरू केली आहे. ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईल वापरायचा नाही, असे फर्मानच समाजाच्या पंचायतीने सोडले आहे. ठाकोर समाजाच्या लोकांनी रविवारी पंचायत ठेवली होती. जालोल गावात झालेल्या या पंचायतीमध्ये मुलींनी मोबाईल वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. गावातील लोक पंचायतीच्या नियमांनाच त्यांचे संविधान मानत आहेत.

या पंचायतीचे लोक समाजाचे नियम बनवितात. या नव्या नियमानुसार अविवाहित मुलगीने मोबाईल बाळगणे ठाकोर समाजाच्या नियमांचे उल्लंघन करत गुन्हा समजला जाणार आहे. जर समाजाच्या अविवाहित मुलीकडे मोबाईल आढळला तर तिच्या वडिलांना 1.5 लाख रुपयांचा दंड पंचायतीकडे जमा करावा लागणार आहे. तसेच जर एखादी मुलगी कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लग्न करत असेल तर त्यालाही गुन्हा मानला जाणार आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.