‘खतरों के खिलाडी’मधील स्पर्धक अनुष्का सेन करोना पॉसिटीव्ह

मुंबई : ‘खतरों के खिलाडी’चा अकरावा सिझन चांगलाच चर्चेत पाहायला मिळत आहे. नुकतीच सेटवरून आता एक मोठी बातमी आलीय. ती म्हणजे या शोमधील स्पर्धक अनुष्का सेनला करोनाची लागण झालीय. मात्र यामुळे आता शोच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.

एका वृत्तानुसार अनुष्काची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व स्पर्धक तसंच शोसंबंधीत सर्व क्रू मेंबर्सची करोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सर्व स्पर्धकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनुष्काला क्वारंटाइन करण्यात आलंय.

शोमध्ये टेलिव्हजनवरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. यात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, राहुल वैद्य, वरुण सूद,अभिनव शुक्ला, सौरभ राज जैन आणि निक्की तांबोळी अशा अनेकांची नाव आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा