InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कुणाला मारणे, हल्ला करणे ही आमची संस्कृती नाही – नितेश राणे

उपअभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना काल ओरोस जिल्हा कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर नितेश राणेंसह सर्व 18 जण रात्री 11 च्या सुमारास सावंतवाडी कारागृहातून बाहेर आले. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी 10 जुलै रोजी त्यांना जामीन मंजूर केला.

“कुणाला मारणे, हल्ला करणे ही आमची संस्कृती नाही. अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे काम केले तर अशी आंदोलने होणार नाहीत. जनेतेचे सर्व पर्याय संपतात तेव्हा अशा पद्धतीची आंदोलने, उद्रेक होतात. अधिकाऱयांनी 353 कलमाचा वापर कवच म्हणून करावा, शस्त्र म्हणून करू नये” असे आवाहन नितेश राणे यांनी केलं.

पुढच्या टर्ममध्ये लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा संधी मिळाली तर 353 कलममध्ये बदल करण्याची मागणी करणार, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply