मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे किंग खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई : एनसीबीने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात बॉलिवूड किंग खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह काहींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना करण्यात आलीय.

आर्यनच्या अटकेनंतर शाहरूख खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याचे सध्या सुरु असलेले पठाण चित्रपटाचे शुटींग पुढे ढकललं आहे. आर्यनला एनसीबीकडून अटक केल्यानंतर माध्यमांनी शाहरूख खानची प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु,अद्याप माध्यमांना शाहरूख खानने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. मुलाच्या अटकेनंतर शाहरूख खानच्या बंगल्याखाली माध्यमांनी बराच वेळ गर्दी देखील केली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा