Kiren Rijiju | किरेन रिजिजू यांची कायदामंत्री पदावरून हकालपट्टी; न्यायव्यवस्थेत ढवळाढवळीचा आरोप !
Kiren Rijiju | नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ( BJP), महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. तर आज (18 मे) केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं मंत्रिमंडळ रचनेत मोठा बदल केला असून किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी किरण रिजीजू न्यायव्यवस्थेत ढवळाढवळी करत असल्याचा आरोप केला आहे. निखिल वागळे म्हणतात किरण रिजीजू यांच्याकडून कायदा खातं काढून घेतलं. न्यायव्यवस्थेत ढवळाढवळीचा परिणाम!
तसचं कायदामंत्री पदावर किरेन रिजिजू यांच्या जागेवर आता भाजप नेते अर्जून राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये रवीशंकर प्रसाद यांच्या जागेवर किरेन रिजिजू यांची केद्रीय कायदामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा केद्रीय कायदामंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काही राज्याच्या विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जातं आहे. तर आता कर्नाटक निवडणुकीनंतर राजस्थान निवडणुक तोंडावर आली असल्याने भाजपला राजस्थान मध्ये सत्ता मजबूर करण्यासाठी अर्जुनराम मेघवाल यांची मदत होऊ शकते. कारण अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित आहेत. या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! पुढील पाच दिवस वाढणार उन्हाचा तडाखा
- Nitesh Rane | “संजय राऊतांचा लव्ह जिहाद…”; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र
- Raosaheb Danve | 2024 निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत फूट पडणार; रावसाहेब दानवे यांचं भाकीत
- Sanjay Raut | रावसाहेब दानवेंनी निवडून येऊन दाखवावं; संजय राऊतांचं दानवेंना खुलं आव्हान
- Mumbai Police | एकीशी साखरपुडा दुसरीशी लग्न करणाऱ्याची पोलिसांकडून वरात
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3olab7o
Comments are closed.