Kirit Somaiya। जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांचे पार्टनर राजीव साळुंखेला अटक

Pune Covid Center Scam | पुणे : कोरोना काळात पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर मध्ये मोठा घोटाळा झाला. याप्रकरणी भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) हे पाठपुरावा करत होते. तर आता त्यांनी ट्विट करत राजीव साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. सुजित पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे पार्टनर आहेत. तर त्यांनी ही अटक करण्यात यावी अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी काय ट्विट केलं (What Kirit Somaiya tweeted)

सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी (Pune Covid Center Scam) एकाला अटक करण्यात आली आहे. ते म्हणजे राजीव साळुंखे आहेत. तर राजीव साळुंखे हे संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहे. तसचं डॉ हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजित पाटकर हे अद्याप फरार असून त्यांना अटक करा अशी सोमय्या यांनी मागणी केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे. असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि या संबंधित अधिकाऱ्यांनवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला.पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचं काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला दिलं त्यावेळी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. तसचं जी कंपनी ब्लॉक लिस्टमध्ये होती त्या कंपनीला पुन्हा काम कसं दिलं? असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला. त्यावेळी सरकारने या कंपनीविरोधात कोणताच गुन्हा दाखल केला नाही. या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणी संबंधित लोकांबाबत सत्ताधारी सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-