Kirit Somaiya | आक्षेपार्ह व्हिडिओनंतर किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र, म्हणाले…
Kirit Somaiya | टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
त्याचबरोबर त्यांच्या या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवलं आहे.
I have never abused any woman – Kirit Somaiya
ट्विट करत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, “एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे.
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी देवेंद्र फडणवीस
यांना विनंति.”
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “मी अनेक महिलांवर अत्याचार केले अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याचे अनेक व्हिडिओ क्लिप्स आहे, असे दावे केले जात आहेत.
मात्र, माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी अशी माझी आपणास विनंती आहे.”
दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलं सुनावलं आहे. भाजपचं राजकारण दिवसेंदिवस घाणेरडे होत चाललं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | विरोधी पक्षनेता कोणाचा होणार? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं
- Bacchu Kadu | तीन इंजिनच्या सरकारमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो – बच्चू कडू
- Uddhav Thackeray | ‘कलंक’ मतीचा झडो; ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
- Monsoon Session | शेतकरी संकटात असताना काही टोळ्या हप्ते वसूल करतायं – बाळासाहेब थोरात
- Nitesh Rane | “बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत मी उद्धव ठाकरेंना हिजडा..”; तृतीयपंथीयांच्या नाराजीवर नितेश राणेंचं स्पष्टीकरण
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3K3gpkh
Comments are closed.