Kirit Somaiya | “तोतऱ्याने तुमच्या बायकोचे बंगले कुठे गायब केले ते द्या”; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Kirit Somaiya | मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या हे विरोधकांवर आरोप – प्रत्यारोप आणि ईडी प्रकरणासाठी ओळखले जातात.  आज महाराष्ट्रात ईडीचे प्रकरण सुरू असून विरोधकांनी सोमय्यांना टार्गेट केलंय. परंतु आता सोमय्यांनी खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांवर तोतऱ्या तर संजय राऊत यांनी पोपटलाल अशी खिल्ली उडवली होती. त्यावर उत्तर  देतांना सोमय्या म्हणाले, ” शिवीगाळ करणे हीच संजय राऊत यांची संस्कृती आहे. त्यामुळेच त्यांना ईडीच्या कोठडीत देखील राहावे लागले. यामुळे त्यांची पीडा समजून घेतली पाहिजे. तसेच उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांच्या प्रकरणावर सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं. “उद्धव ठाकरे तोतऱ्या म्हणतात. पण महाराष्ट्राला या तोतऱ्याचा अभिमान आहे. बायकोचे १९ बंगले कुठे आहेत?”, असा सवाल किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय.

पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या शिव्यांचा उल्लेख (Kirit Somaiya Talk About Sanjay Raut In Press Conference)

भर पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या शिव्यांचा उल्लेख किरीट सोमय्यांनी केला. “भ×वा, ×तिया, असा संजय राऊतांनी दिलेल्या शिव्यांचा उल्लेख किरीट सोमय्यांनी केला. अशावर सोमय्या म्हणाले की, “हीच का संस्कृती. खालच्या पातळीचे लोक, खालच्या पातळीची भाषा करतात”, असे म्हणत त्यांनी पलटवार केला.

उद्धव ठाकरेंना किरीट सोमय्यांच्या कोपरखळ्या  (Kirit Somaiya Talk About Uddhav Thackeray)

“उद्धव ठाकरे तोतऱ्या म्हणतात. पण महाराष्ट्राला या तोतऱ्याचा अभिमान असल्याचे म्हंटले जात आहे. बायकोचे १९ बंगले कुठे आहेत?”, या जुन्या कारवाईवरून त्यांनी प्रतीसवाल करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.