Kirit somaiya | राजकीय नेत्यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारावर…”; मुलाच्या ‘पीएचडी’वर टीका करणाऱ्यांना किरीट सोमय्यांनी सुनावलं

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या मुलाची पिएचडी अवघ्या १४ महिन्यांमध्येच पुर्ण झाली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे नील सोमय्या यांची पीएचडीची पदवी वादात आली आहे. अशातच फाईल्स आणि कागदपत्र दाखवून दीड डझन नेत्यांमागे चौकशीचा ससेमीरा लावणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या पदवीवर आता कारवाई होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नील सोमय्यांनी (Nil Somaiya) ऑगस्ट महिन्यात प्रबंध सादर केला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. या तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याचं दिवशी पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली आहे. 17 सप्टेंबर 2016 ला नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा आहे. तर पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे.

यावरून सध्या समाज माध्यमांवर चर्चा रंगला होत्या. त्यावर किरीट सोमय्यांनी भाष्य केलं आहे.किरीट सोमय्या म्हणाले, “नील सोमय्याला पीएच.डी.साठी सहा वर्षे लागले. 17 सप्टेंबर 2016 रोजी मुंबई विद्यापीठ पीएच.डी. प्रवेश परीक्षा दिली. सप्टेंबर 2017 मध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केले. 1 ऑक्टोबर 2022 ला पीएच.डी.ची डिग्री मिळाली आहे. नीलचे वडील किरीट, आई मेधा सोमय्या यांना पण पीएच.डी. डिग्री मिळाली आहे. परंतु काही राजकीय नेत्यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारावर स्वतःची चेष्टा करून घ्यायची असेल, तर त्यांना देवच वाचवू शकतो,”

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या नील सोमय्या यांच्या पिएचडी बाबत मुंबई विद्यापीठाकडं तक्रार करण्यात आली आहे. मात्र, सर्व काही नियमात केल्याचा दावा केला जात आहे. अशातच, विरोधकांनी सोमय्याच्या मुलाच्या पीएचडीच्या वेगावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 14 महिन्यांचा आरोप खोडून काढत पीएचडीसाठी 72 महिने लागल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, सोशल मीडियावर दोन कागदपत्रे प्रचंड व्हायरल होत आहेत. यातील एका कागदपत्रानुसार 17 सप्टेंबर 2016 ला नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा आहे. तर पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या हायस्पीड कारभराची चर्चा जोरदार रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.