Kirit Somaiya | “लवकरात लवकर तुरुंगात जाण्याची तयारी करा”; सोमय्यांचा ‘हा’ गंभीर आरोप
Kirit Somaiya | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याआधी देखील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एवढंच नाही तर कोरोनाकाळात कोविड सेंटरबाबत भ्रष्टाचार झाला. अशावेळी ते पुणे महापालिकेजवळ गेल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आताही किरीट सोमय्या यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ५०० कोटी रुपये इतका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
“उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी. रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेची दोन लाख वर्ग फूट जमिनीवर कब्जा केला आहे. त्याजागी ५०० कोटीचे पंचतारांकित हॉटेल देखील उभारले आहे.” असा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
“वायकर यांनी मातोश्री ट्रस्ट, सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. महापालिकेच्या हद्दीतील खुले मैदान आणि बागेच्या जागेवर अनधिकृतपणे कब्जा मिळवला आहे. पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यावरली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरु आहे”, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
Kirit Somaiya allegation On Uddhav Thackeray close Associate
“क्रीडांगण आणि बागेच्या कंपनीद्वारे सुप्रीमो बँक्वेट बांधले. या बागेच्या कब्जा केलेल्या जागेची किंमत ४ कोटी एवढी आहे. मात्र वायकर यांनी हा भूखंड ३ लाख रुपयांना खरेदी केला. गेली अनेक वर्षांपासून वायकर लग्न, पार्ट्या असे अनधिकृत काम करत आहेत. महापालिका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास विभागाने या हॉटेलचे बांधकाम तत्काळ थांबवावे” असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Jayant Patil | “भाजप निवडणुका घ्यायला घाबरलं म्हणून…”; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
- Chandrashekhar Bawankule | एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Radhakrishna Vikhe Patil | “शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका
- Shivendra Raje | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा करारा जवाब
- Shambhuraj Desai | “कोण शंभु की चंबू?”; संजय राऊतांच्या टीकेवर शंभूराज देसाईंचा पलटवार, म्हणाले..
Comments are closed.