Kirit somaiya | लव्हजिहादची मुंबईत घटना समोर; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती

Kirit somaiya | मुंबई : देशभरातून लव्ह जिहादच्या ( Love Jihad) अनेक बातम्या समोर येत आहेत. तर आता आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी काय ट्विट केलं

किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मुंबईमधील भांडुप खिंडीपाडा येथील हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणाऱ्या २४ वर्षीय सैफ खानने (Saif khan) १३ वर्ष 8 महिन्याच्या एका हिंदू मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. त्यानंतर तिला सैफ खानने (Saif khan) त्याच्या मूळ गावी आझमगडला घेऊन गेला. तसचं तिचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला होता.

One More Incident Of Love Jihad : Kirit Somaiya

दरम्यान, मुलीने वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ५ दिवस मुंबई पोलिसांनी सैफ (Saif khan) आणि मुलीचा शोध घेऊन अखेर त्यांना शोधून काढलं आहे. त्यानंतर सैफ खान (Saif khan) ला मुंबई पोलिसांनी ( Mumbai police) अटक केली आहे. तर त्या मुलीला मुंबईमध्ये आणण्यात आली असून मी आज त्या मुलीच्या वडीलांना आणि मुलीला भेटलो असं देखील किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तर सोमय्या यांच्या ट्विटनंतर याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MOi5zQ