Kirit Somaiya । “चौकशी सुरू झाली म्हणून पेडणेकरांना भाऊबीज आठवतेय”; किरीट सोमय्यांचा पलटवार

Kirit Somaiya । मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील ६ गाळे हस्तगत केल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर  यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेले आरोप साफ फेटाळून लावले. शिवाय दादर पोलीस स्थानकात चौकशीला मी जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे दबावतंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कसंही करुन मला अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलंय. त्या म्हणाल्या, दवाबतंत्राचा वापर केला जात आहे. तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणून काहीही करायचं का? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे. आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीदेखील जशास तसे उत्तर दिले आहे.

पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे गाळे ढापले आहेत. त्याचा हिशोब द्यावा लागेल. दबावतंत्र तर उद्धव ठाकरे वापरत होते. चौकशी सुरू झाली आहे, त्यामुळे पेडणेकर यांना भाऊबीज आठवत आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, कोरोना साथीला पेडणेकर यांनी कमाईचे साधन बनवण्याचा प्रयत्न केला. मुंबईकरांना लाज वाटत आहे. करोना साथीला हाताळण्यासाठी पेडणेकरांनी त्यांच्याच कंपनीला कंत्राट दिलेले आहे. याबाबतही पेडणेकरांनी स्पष्टीकरण द्यावे. आम्ही दबावतंत्राचा वापर केलेला नाही. उद्धव ठाकरे यांनीच दबावतंत्राचा वापर केला होता. त्यांनी सगळी चौकशी दाबून ठेवली होती. आता चौकशीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पेडणेकर यांना भाऊबीज आठवत आहे, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एसआरएमध्ये फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्याकडून पैसे घेतल्याची तक्रार नऊजणांनी केली आहे. पण लाच देऊनही त्यांना फ्लॅट मिळालेले नाहीत. या नऊजणांकडून मिळालेल्या रकमेचा वाटा पेडणेकरांना देण्यात आल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगानं त्यांची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.