Kirit Somaiya | ४ नेते जेलात ५ वा लाईनीत – किरीट सोमय्या

मुंबई : विनायक आंबेकर यांच्या ‘किंगमेकर क्रॉनिकल- वसुली व घोटाळ्यांचे पर्व’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला भाजप नेते किरीट सोमय्या, भाजप नेते केशव उपाध्ये आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. १९६० पासूनचं हे असं पहिलच सरकार आहे ज्याचे ४ मोठे नेते जेलमध्ये आहेत आणि पाचवे लायनीत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

पुढे बोलताना सोमय्या असं म्हणाले कि, “एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद व्हायला पाहिजे कि लेखकाने पुस्तक लिहून चांगलं काम केलं आहे. परंतु या पुस्तकाचे प्रकाशन करताना दुःख होत आहे. तुमच्या-माझ्या महाराष्ट्रात असा दिवस यावा कि घोटाळ्यांवर, वसूलयांवर पुस्तकं लिहावी, हे खरंच दुर्दैव आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कि, गेल्या ६२ वर्षातलं हे पहिलंच असं सरकार आहे, ज्यातले ४ मोठे नेते जेलमध्ये आहेत आणि पाचवे लायनीत आहेत.”

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.