“किरीट सोमय्यांनी शरद पवारांवरील आरोप थांबवावे, नाहीतर…”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकासाआघाडी सरकारमधील अनेक दिग्गज नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. तर यानंतर आता सोमय्यांनी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अनेक गंभीर केले. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलाचं तापलेलं दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शारदाताई लगड यांनी सोमय्यांना इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर बेछूट आरोप सुरू केले आहेत. त्यांनी ते आरोप थांबबावेत, अन्यथा त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी कारवाई केली जाईल,’ असा इशारा लगड यांनी दिला आहे.

सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये. अनेक रथीमहारथींनी पवार यांच्यावर आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला नाही. उलट तुम्ही आमचे नेते पवार यांचा आदर्ष घेऊन समाजात कसे वागलं पाहिजे हे शिकून घ्या. तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीटी भीती दाखवू शकत नाही. ईडी काय तुम्हाला तुमच्या घरची मालमत्ता वाटते का? असा सवालही अ‍ॅड. शारदाताई लगड यांनी सोमय्यांना विचारला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या