Kirit Somaiyaa | कोणता रिसाॅर्ट होणार जमीनदोस्त?, किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीला

Kirit Somaiyaa | मुंबई : आज भाजप (BJP) नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiyaa) दापोली दौऱ्यावर असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एक रिसाॅर्ट जमीनदोस्त होणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विटद्वारे माहिती देखील दिली आहे. त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.

यादरम्यान, “चला”, ठाकरे सरकारचा घोटाळ्यांचे स्मारक, “ट्वीन रिसॉर्ट तोडूया” , आज पहाटे ३.३० वाजता दापोली पोहोचलो, १० वाजता दापोली पोलिस स्टेशन, ११ वाजता सी कोंच रिसॉर्ट / साई रिसॉर्ट, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सध्या तरी पडण्याची शक्यता नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तूर्तास रिसॉर्ट मालकाला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट व सीकोंच दोन्ही रिसॉर्ट गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरले आहेत. यापैकी सिकोंच रिसॉर्टवर हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.