Kisan Samridhi Kedra | किसान समृद्धी केंद्र द्वारे शेतकरी मिळवू शकतात अनेक सुविधा, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी उत्पादनात वाढ करत आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कृषी उत्पादने बाबतीत भारत हा स्वावलंबी बनत चालला आहे. दरम्यान, भारतामध्ये 600 हून अधिक प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना PM Kisan Samridhi Kedra केंद्र सुरू झाली आहेत. या केंद्रांमार्फत शेतकरी विविध सुविधा मिळू शकतात. आधी शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटनाशके, कृषी उपकरणे, माती परीक्षण इत्यादी करण्यासाठी जागोजागी भटकावे लागत होते. पण आता किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकरी या सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकतात. किसान समृद्धी केंद्रामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी गोष्टी योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकरी आता एकाच ठिकाणी या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात.

शेती उपयोगी गोष्टींबरोबरच किसान समृद्धी केंद्रामध्ये शेतकरी शेती तज्ञांशी देखील संपर्क साधू शकतात. या समृद्धी केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आणि कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना 15 दिवसानंतर किंवा महिन्याच्या अंतराने कृषी तज्ञांशी संपर्क साधून दिला जाईल. याव्दारे शेतकरी आपल्या सर्व शंकांचे निवारण करू शकतील.

किसान समृद्धी केंद्र Kisan Samridhi Kedra द्वारे खतांचा काळाबाजार होणार नाही

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यामागे केंद्र सरकारची अनेक कारणे आहेत. यामध्ये मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि कृषी सेवा पुरवणे आहे. गेल्या काही वर्षापासून खतांच्या आणि बियांच्या काळाबाजारामध्ये वाढ झाली होती. परिणामी केंद्र सरकारला किसान समृद्ध केंद्र सुरू करायची गरज भासू लागली. बियांचा आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी किसान समृद्ध केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर पेरणीच्या हंगामात व्यापारी आणि दुकानदार जास्त किमतीमध्ये शेतकऱ्यांना बियाणे विकतात. पण किसान समृद्ध केंद्र हीच बियाणे शेतकऱ्यांना कमी किमतीत उपलब्ध करून देतात.

किसन समृद्धी केंद्र मार्फत शेतकरी मिळू शकतील विम्याचा लाभ

किसान समृद्धी केंद्राद्वारे शेतकऱ्यांना खरेदी विक्री दर करता येईलच पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना इथे खतांच्या अपघाताचा विमा देखील करता येईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक खताच्या गोणीवर IFFCO कडून 4,000 रुपयांचा अपघात विमा दिला जातो. या आधी शेतकऱ्यांना विमा संबंधित कुठलीही समस्या निर्माण झाली तर विमा कंपनी किंवा बँकेमध्ये जावे लागत होते. पण आता शेतकऱ्यांना विमा संबंधित सर्व माहिती किसान समृद्धी केंद्रावर उपलब्ध करून दिली गेली आहे.

किसान समृद्धी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी एकत्रित व्यासपीठ आहे. इथे शेतकरी खरेदी-विक्रीसह विमा चा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर इथे शेतकऱ्यांना मातीचे परीक्षण देखील करून देण्यात येईल. मातीच्या परीक्षणासोबतच शेतकऱ्यांना किसान समृद्धी केंद्रामध्ये तज्ञांचा सल्ला मिळवून देण्यात येण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.