Kishor Patil । “संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना संपवायची सुपारी तर घेतली नाही ना?” : किशोर पाटील

Kishor Patil । जळगाव : आज (२३ एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पाचोऱ्यात आहेत. अशातच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी संजय राऊतांसह आयोजक आणि चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi) यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे आर ओ पाटील यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. त्यानिमित्त हि सभा आयोजित करण्यात आली आहे.

काय म्हणाले किशोर पाटील (What did Kishore Patil say)

माध्यमांशी बोलताना किशोर पाटील म्हणाले की, माझे काका दिवंगत नेते आर ओ पाटील यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आले देखील नाहीत. संजय राऊतांमुळे खर उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. ही माझ्या दिवंगत काकांसाठी सभा आहे. त्यामुळे कुठलंही गालबोट लागणार नाही. तसेच ही सभा शांततेत पार पाडावी, याची जबाबदारी मी घेत असून आमचे नेते गुलाबराव पाटील यांनाही विनंती करणार असल्याचे पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटले आहे. तसचं राऊत यांना सल्ला आहे की तुमच्या बेताल वक्तव्यांमुळे महाराष्ट्र आज अस्वस्थ झाला आहे. कधी कधी शंका येते की “राऊत यांनीच तर उद्धव ठाकरे यांना संपवायची सुपारी घेतली तर नसेल ना?” असा खळबळजनक सवाल देखील किशोर पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या सभेकडे राजकीय हेतूने पाहत नाही. मी त्या सभेसाठी येणाऱ्या सगळ्या लोकांचे स्वागत करतो. मात्र सभेला जाणार नाही, आता पुतळ्याच्या लोकार्पणाची सभा आहे. अशा गोड कार्यक्रमात जर कुठे गालबोट लागलं तर? कारण शेवटी मी एकटा जाणार नाही. माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते असणार आणि शेवटी कार्यकर्ता असतो. सध्या संजय राऊत यांच्याकडून एखादं बेताल वक्तव्य झालं आणि तिथे एखादा कार्यकर्ता असला तर सभेची वाट लागणार. तसचं गुलाबराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी देखील सभा उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे आजची सभा नीट पार पडावी यासाठो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.