Kishori Pednekar | ‘आईसक्रीम कोन’च्या विधावरुन किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंवर हल्ला

मुंबई : भाजप (BJP) पक्षाचे नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर बोलताना एक वक्तव्य केलं. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे.” यावर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का? तुम्ही भारतीय नागरिक म्हणून योग्य आहात का? असे खोचक सवाल करच किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. पडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “विंद्र वायकर यांनी वास्तव सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले चिन्ह हे मशाल आहे. त्यांच्या (शिंदे गट) निवडणूक चिन्हाबद्दल लोक ढाल कोणाची आणि तलवार कोणाची, असे म्हणत आहेत. मात्र आम्हाला मिळालेले मशाल हे निवडणूक चिन्ह शिवसेनेचेच होते. हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेले आहे. तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का? तुम्ही भारतीय नागरिक म्हणून योग्य आहात का? असे सवाल किशोरी पेडणेकर यांनी केले आहेत.”

दरम्यान, नितेश राणेंच्या याच वक्तव्यावर शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनीही भाष्य केलं आहे. ती मशाल नसून कोन आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल आहे हे चटके बसल्यानंतर कळू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.