Kishori Pednekar | उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? किशोरी पेडणेकरांची ED चौकशी होण्याची शक्यता

Kishori Pednekar | मुंबई: मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कोविड घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) करत आहे. या प्रकरणाची कारवाई करत असताना ईडीनं गेल्या तीन दिवसात जवळपास 15 ठिकाणी छापीमारी केली आहे. ईडीनं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्ती यांच्या घरी देखील धाड टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई महानगरपालिका कोविड घोटाळ्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची सुद्धा ईडी चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण किशोरी पेडणेकर महापौर असताना हा घोटाळा झाल्याचं म्हटलं जातं आहे. किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

Ede raided Suraj Chavan’s house

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी ईडीन छापेमारी केली. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेतील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या निवासस्थानी देखील धाड (Kishori Pednekar) टाकली. त्यानंतर ईडी आता किशोरी पेडणेकर यांची चौकशी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, कोविड काळामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसने केलेल्या घोटाळ्यावरून ईडी कारवाई करत आहे. या प्रकरणाची ईडीकडून सखोल चौकशी सुरू आहे. या घोटाळा प्रकरणावरून ईडीनं (Kishori Pednekar) आतापर्यंत 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NLuuoL