Kishori Pednekar | दिपाली सय्यद यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Kishori Pednekar | मुंबई : दिपाली सय्यद यांनी काल (शनिवार) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. भेट घेऊन आल्यानंतर दिपाली सय्यद यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)
दीपाली सय्यद यांनी कोणाला भेटावे का भेटावे? हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी जेवढे चुकीचे मत व्यक्त कराल तेवढे मोठे पद मिळेल, असा प्रकार सध्या सुरू असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की इप्सित साध्य होते. त्यामुळे दीपाली सय्यद असो किंवा अन्य कोणी, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
दिपाली सय्यद यांचे वक्तव्य
दरम्यान, ठाकरे गटाचे सध्या राज्यभर दौरे सुरू आहेत. यावर दिपाली सय्यद म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यभर दौरा करायला हवा होता. त्यांना भेटण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागायची. त्यांच्या बाजूची चार माणसं आमचा संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नव्हते.
तसेच, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते,असंही त्यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Vikram Thackeray | “उद्या ४ वाजता मी…”, देवंद्र भुयार यांच्या ‘त्या’ धमकीला विक्रम ठाकरेंचं आव्हान
- Deepali Sayyad | एकनाथ शिंदेंची भेट घेताच दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…
- Shivsena | क्षीरसागरांना शिंदेंच्या कार्यक्रमाला जाणं भोवलं, शिवसेना पक्षाने थेट केली हकालपट्टी
- Deepali Sayyad | शिंदे गटात जाणार का? दिपाली सय्यद यांनी केलं स्पष्ट, म्हणाल्या…
- Narayan Rane | “ठाकरे गटातील चार आमदार संपर्कात”; नारायण राणेंचा दावा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.