Kishori Pednekar | ‘मिलिंद नार्वेकरांनी दिल्या अमित शहांना शुभेच्छा’, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
Kishori Pednekar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच यासगळ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)
नार्वेकर यांची ही कृती बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीतूनच झाली आहे. शुभेच्छा देणं ही आपली राजकीय संस्कृती आहे. मीसुद्धा अमित शहांना शुभेच्छा देते, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. किशोरी पेडणेकर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मिलिंद नार्वेकरांच्या अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मा. गृहमंत्री श्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. सर्वशक्तिमान परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो, असं ट्विट मिलिंद नार्वेकरांनी केलं आहे.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी अमित शहा यांना शुभेच्छा देताच भाजप पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. मिलिंद नार्वेकर यांचे अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत असं म्हणत मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर हे नाराज आहेत, शिवसेनेत कोण राहील कोण जाईल हे सांगता येत नसल्याचं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Makeup Tips | चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी ‘या’ सोप्या पद्धतींचा करा वापर
- Ambadas Danve | “…म्हणून शिंदे गट, भाजप, मनसे महापालिकेसाठी एकत्र येतील”; अंबादास दानवेंनी बोचरी टीका
- Narayan Rane | “उद्धव ठाकरेंचं राजकारण ‘मातोश्री’पुरतं चालतं म्हणून…”, नारायण राणेंची बोचरी टीका
- Girish Mahajan | मनसे भाजप युती होणार ?, गिरीश महाजन यांनी केलं स्पष्ट म्हणाले…
- Girish Mahajan | मिलींद नार्वेकरांनी अमित शहांना शुभेच्छा देताच गिरीश महाजन म्हणाले – “शिवसेनेत नाराज…”
- Ajit Pawar | राज ठाकरे, शिंदे, फडणवीस भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.