Kishori Pednekar | “विश्वासघातकी बॅकग्राऊंडचे लोक” ; किशोरी पेडणेकरांचा नारायण राणेंवर घणाघात

मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे शिवसैनिक भिडले. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमिवर सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच 50 शिवसैनिकांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांचा जामीन झाल्यानंतर मातोश्रीवर त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेटल घेतली. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना इशारा दिला. याला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

मातोश्रीच्या दुकानात बसुन फक्त तक्रारींचे मार्केटींग सुरु आहे. असे हल्ले करु नका, शेवटी महाराष्ट्रात मुंबईत, राहायचं आहे, फिरायचं आहे. परवानग्या घ्याव्या लागतील, असा थेट इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. आम्ही या हल्याची दखल घेत नाही, जर दखल घेतली तर चालणं, बोलणं, फिरणं किती कठीण होईल ते, असा इशारा देखील राणेंनी ठाकरेंना दिला. दसरा मेळाव्यावर राणे म्हणाले, खरी शिवसेना शिंदे गट दसरा मेळावा घेतील. पक्षाचे चिन्ह देखील त्यांना मिळणार आहे.

किशोरी पेडणेकर यांचे जोरदार उत्तर –

“इशारा देत आहे की धमक्या देत आहात. सरकार बदललं आहे. हे धमक्या देणार सरकार आहे का? हे मला उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्या रस्त्यांवर फिरू देणार नाही म्हणतात. विश्वासघातकी बॅकग्राऊंडचे लोक आम्हाला सांगतील. सर्वसामान्यांना मुंबईत धमकावू नका. फालतू धमक्या मुंबईकरांना देऊ नका”, अशा किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “नारायण राणे साहेबांची इमेज उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. केंद्रातले लोक इथं येवून धमक्या देणार असतील तर आम्ही ऐकून घेणार नाही. आधी नाही ऐकले तर आता काय ऐकणार.”

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.