Kishori Pednekar । “कुणाच्या कळा, कुणाचं बाळंतपण…”; किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर घणाघात

(Kishori Pednekar) मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. यासंदर्भात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सगळ्यांना कळतं आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

भाजप आणि ईडी सरकारला मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आणि भोंगे लागतात. पत्रं लिहिणाऱ्यांना एक विनंती आहे. आपल्या हातून फॉस्कॉन जाऊन पॉपकॉर्न आला आहे, त्याबद्दलही एक पत्रं लिहावं, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे. भाजप फक्त जांबोरी मैदान मिळवून सोहळे साजरे करू शकते. ते मैदान मिळवू शकतात. मैदान मारू शकत नाहीत, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सरपंचाच्या निवडणुकीला मिळालेले यश हे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आणि निष्ठावंत शिवसैनिकांना मिळालेलं असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत त्यांनी रिफायनरीच्या मुद्द्यावर शिवसेना कायम स्थानिकांबरोबर राहिली असल्याचं सांगितलं. शिवसेना आपली भूमिका बदलत नाही. तिथल्या लोकांना काय हवे यानुसार आम्ही निर्णय घेतो. त्याला बदलती भूमिका म्हणत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

तुम्ही सगळे प्रयत्न केले पक्षाचे नाव गोठवले, धनुष्यबाण गोठवले. सरपंचाच्या निवडणुकीत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर यश मिळाले. तुमच्याकडे महासत्ता असताना हे होऊ शकले नाही. त्यामुळे तुमच्याकडून डिवचण्याचा प्रयत्न होणारच होता, असा चिमटाही त्यांनी काढला. तुम्ही शिवसेनेला संपवू इच्छित होतात. ते होऊ शकले नाही, असंही त्यांनी सांगितलं. चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्याने लोकांमध्ये चीड असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.