Kishori Pednekar । “मे महिन्यात तुम्ही जे फटाके फोडले त्याचे…”; एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पेडणेकरांचा टोला

Kishori Pednekar । मुंबई :  टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. संपूर्ण जगात भारतीय संघाचे कौतुक असताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं. याबरोबरच त्यांनीही तीन साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली असल्याचा टोला विरोधकांना लगावला. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या टोलेबाजीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “मे महिन्यात तुम्ही जे फटाके, लवंगी बार फोडले; त्याचे पॅकेट म्हणजेच पॅकेज वेगळे आहे,” असे किशोरी पेडणेकर खोचकपणे म्हणाल्या आहेत.

शिंदे  गटावर नेहमीच पैसे घेतल्याचे आरोप ठाकरे गटाकडून केले जातात. याचसंदर्भात बोलत किशोरी पेडणेकर यांनी शिंदेंना चिमटा काढला आहे. पैसे देऊन शिवसेनेतील आमदार फोडण्यात आले, असे त्यांना म्हणायचे होते.

काय म्हणाले होते शिंदे?

दिवाळी निमित्ताने रविवारी ठाण्यात  दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच जोरदार फटकेबाजी केली. कालची मॅच भारताने जिंकली.(India Won Match)  तशीच आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकली. या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली, अशी तुफान फटकेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली. टीम इंडिया जिंकली हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सव आहेच. तुम्ही पाहिलं असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.