KL Rahul | विराटबाबत ओपनिंगच्या प्रश्नावर केएल राहुल म्हणाला, “तर मी काय बाहेर बसू…”

नवी दिल्ली : आशिया कप 2022 च्या शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर (IND vs AFG) मोठा विजय मिळवून आपल्या मोहिमेचा शेवट केला. भारताने अफगाणिस्तानला 101 धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताला विजय निश्चितच मिळाला पण आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने या सामन्याने दोन्ही संघांना काही फरक पडला नाही. या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के एल राहुल याने भारताची धुरा सांभाळली. विराट कोहली आणि के एल राहुलने सलामी दिली. केएल राहुलला जेव्हा विराट कोहलीच्या सलामीबद्दल विचारण्यात आले तेव्हा राहुलने अतिशय मजेशीर उत्तर दिले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली याची शतकी खेळी-

विराट कोहलीने आशिया चषक 2022 च्या सुपर-4 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी खेळली आणि विराटने ही खेळी भारताकडून सलामी करताना खेळली.

आगामी काळात विराट कोहली सलामीवीर म्हणून बघायला मिळेल?-

दरम्यान, सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कर्णधार केएल राहुलला विचारले की, विराट कोहलीने ओपनिंग करताना 5 शतके झळकावली आहेत, त्यामुळे आगामी काळात तो सलामीवीर म्हणून बघायला मिळू शकतो. याबद्दल संघ व्यवस्थापनात कोणती चर्चा होते का?

विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर टीमसाठी महत्त्वाचा-

यावर राहुल हसत हसत म्हणाला, ” तर मग मी काय बाहेर बसू?”. राहुल म्हणाला की, एक खेळाडू म्हणून विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर टीमसाठी महत्त्वाचा आहे. त्याने खूप धावा केल्या आहेत. आताही तो धावा करतो. हे खरे आहे की विराट कोहलीने ओपनिंग करताना शतक झळकावले आहे, पण त्याच्यात क्षमता आहे की तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाही शतक ठोकू शकतो.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.