KL Rahul & Athiya Shetty | सजला केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचा मंडप, पाहा VIDEO

KL Rahul & Athiya Shetty | खंडाळा: गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री अथिया शेट्टी आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे. सुपरस्टार सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाउसमध्ये हे दोघं लग्न गाठ बांधणार आहे. आजपासून (22 जानेवारी) या दोघांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्न मंडपाचा व्हिडिओ लीक झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या लग्न सोहळ्यामध्ये फक्त शंभर पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इतर बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणेच अथिया आणि केएलने त्यांच्या लग्नामध्ये ‘नो फोन’ पॉलिसीचे पालन करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लीक होणार नाही. या दोघांच्या लग्नाला बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ, सलमान खान, अक्षय कुमार आणि दिग्गज क्रिकेट खेळाडू एम एस धोनी, विराट कोहली आदी हजेरी लावणार असल्याची माहिती मिळाली आहे. 23 जानेवारी रोजी आथिया आणि केएल राहुल लग्न बंधनात अडकणार आहेत.

एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीमध्ये दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. 2021 मध्ये या दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं होतं. त्यानंतर हे दोघं एकत्र दिसले आहे. अथिया अनेकदा राहुलच्या मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. तर दोघं सोशल मीडियावर सतत एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

काही दिवसांपूर्वी केएल राहुलच्या पाली हिल्स येथील घराच्या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तो अथियासोबत 23 जानेवारी रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चांना यानंतर उधाण आलं होतं. मात्र, अथिया आणि राहुल यांच्या कुटुंबीयांकडून किंवा त्यांच्याकडून लग्नाबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.