एकनाथ खडसेंच्या कन्येने फोडला प्रचाराचा नारळ

मुक्ताईनगर मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी मुक्ताईमंदिरात मुक्ताईच दर्शन घेत आपला प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, मंदाताई खडसे यांच्यासह शेकडो भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...

रोहिणी खडसे यांच्या विरोधात सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. त्यांना आघाडीने पाठिंबा दिला आहे. मात्र हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला असला तरी जनतेला मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार कमी करण्याची अजित दादा पवार यांची ही खेळी असली तरी त्यात त्यांना यश मिळणार नसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.