InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महाराष्ट्रात ‘नोटा’ला झाले तब्बल 4 लाख 88 हजार मतदान

नुकत्याच लोकसभा निवडणूका पार पडल्या आणि निकाल सुद्धा जाहीर झाले. भाजपने ऐतिहासिक भूमिका बजावत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. भाजपने एकूण ३४८ जागा मिळवल्या. तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने ४८ जागांपैकी ४१ जागांवर विजय मिळवला.

निवडणुकांमध्ये मतदारांना नोटा पर्याय उपलब्ध असतो. यामध्ये मतदार नकारात्मक प्रतिसाद देत नोटा विकल्पाचा वापर करतात. दरम्यान महाराष्ट्रात एकूण ४,८८,७६६ मतदारांनी उमेदवारांना नाकारले असून त्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर सर्वाधिक नोटा मतदान २९,४७९ पालघर मतदार संघात झाले. यापाठोपाठ गडचिरोली मध्ये २४,५९९ तर नंदुरबार मध्ये २१९२५ नोटा मतदान झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply