InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विराटने धोनीला टाकले मागे

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला. विराट कोहलीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार रन पूर्ण केले आहेत. विराट सगळ्यात जलद हजार रन पूर्ण करणारा कर्णधार बनला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हजार रन पूर्ण करणारा विराट हा सहावा कर्णधार आहे.

दुसऱ्या टी-२० सुरु होताना हजार रन पूर्ण करायला विराटला २५ रनची गरज होती. या मॅचमध्ये विराटने नाबाद ३० रनची खेळी केली आणि भारताला जिंकवून दिलं.कर्णधार म्हणून १ हजार रन पूर्ण करणारा कोहली हा धोनीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. धोनीने ६२ मॅचमध्ये १,११२ रन केले आहेत.

Loading...

मॅच सुरु होण्याआधी विराट आणि रोहित यांच्यानावावर टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी २,६३३ रन होत्या. पण या मॅचनंतर विराटच्या खात्यात २,६६३ रन झाल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धची तिसरी टी-२० मॅच शुक्रवारी पुण्यात खेळवण्यात येणार आहे. ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये भारताने १-०ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीमधली पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली होती.

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.