विराटची तुलना ही थेट अनुष्काचा कुत्रा म्हणून केल्याने कोहलीचे चाहते संतापले 

नवी दिल्ली : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना विराटने  सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. या शुभेच्छा देत असताना विराटने फटाके न फोडण्याचं आवाहन केलं. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.

या नंतर काहींनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली तर काहींनी त्याची बाजू घेतली आहे. #अनुष्का_तेरा_कुत्ता_संभाल असा हॅशटॅग हा काही वेळ ट्रेंडिंगमध्ये होता. मात्र याच दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते उदीत राज यांनी विराटची बाजू घेतली.उदीत राज यांनी मात्र विराटची बाजू घेत असताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी देखील विराटची तुलना ही थेट अनुष्काचा कुत्रा म्हणून केली आहे.

उदीत राज यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरन याबाबत ट्विट केलं आहे. कुत्र्यापेक्षा जास्त इमानदार कोणीच नाही. कोहली तू मूर्ख लोकांना प्रदुषणापासून माणसांना धोका असल्याची शिकवण दिलीस. विराट कोहलीच्या या चांगल्या सल्ल्याचं मी स्वागत करतो असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. विराटची तुलना ही थेट अनुष्काचा कुत्रा म्हणून केल्याने कोहलीचे चाहते संतापले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.