Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद
Kolhapur Protest | कोल्हापूर: काल संपूर्ण राज्यात उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात मोर्चे काढण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात आलं आहे.
Hindutva organizations took out a march at Shivaji Chowk
कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच तीव्र आंदोलन (Kolhapur Protest) सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरच्या शिवाजी चौकात मोर्चा काढत गर्दी केली. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये दगडफेक देखील झाली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन (Kolhapur Protest) सुरू करण्यात आले. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
कोल्हापूरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आंदोलनानंतर (Kolhapur Protest) शहरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- WTC Final | WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
- Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात
- Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?
- WTC Final | क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एका सामन्यासाठी 2 पिच, नक्की काय आहे प्रकरण?
- HSC/SSC Re-Exam | दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा होणार ‘या’ तारखेपासून, पाहा वेळापत्रक
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3J0SZeR
Comments are closed.