मुख्यमंत्र्यांकडून कोकणाची थट्टाच; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर  टीका

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले, मात्र चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोललेच नाही. भरभरून देण्याऱ्या कोकणच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

निसर्ग वादळात अनेक घोषणा झाल्या, मात्र आपदग्रस्तांच्या हाती काही आले नाही. हेक्टरी पैसे दिल्याने ५००रु प्रतिझाड एवढीच मदत शेतकऱ्यांना मिळाली. ही एक प्रकारे कोकणवासीयांची थट्टाच असल्याची टीका फडणवीस यांनी मालवण आचरा येथे केली.

शेतकरी मच्छीमार यांना उभे करायचे असेल तर कर्जमाफी आणि भरघोस मदत त्यांना मिळाली पाहिजे. यासाठी या पाहणी दौऱ्यातून सरकार आणि सरकारी यंत्रणेला जागे करून त्यातून जास्तीत जास्त कोकणवासीयांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा