कोरेगाव भीमा : मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना जिल्हाबंदी

मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली’; अमेय घोले यांची अमृता फडणवीसांवर टीका

विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले. ‘कार्यक्रम सुरळीतपणे होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.

विजयस्तंभ परिसरात प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत; तसेच पेरणे फाटा ते पेरणे गाव या रस्त्यावर कायमस्वरूपी पथदिवे बसविण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरूपात प्रकाश व्यवस्था व ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात येणार आहे,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. ‘कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी विविध पक्ष, संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

‘रिमोट कंट्रोल निकामी झाल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुक लढवत आहेत’

टँकरद्वारे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, फिरते स्वच्छतागृह, एसटी महामंडळ व पीएमपीएल बसची सोय, आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या परिसराचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार अहे. नागरिकांना अभिवादनस्थळाची क्षणचित्रे दिसण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या परिसरात अतिरिक्त पोलिस यंत्रणा असणार आहे.’

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.