InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बहुमत सिद्ध करण्यासाठी कुमारस्वामी तयार

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील राजकीय परिस्थिती मंगळवारपर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार असल्याची घोषणा केली आहे. विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी कुमारस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांना वेळही मागितली आहे.

कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेले राजीनामे आणि या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे आलेली याचिका याचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने मंगळवारपर्यंत कर्नाटकची राजकीय परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे या आमदारांचे राजीनामे लटकले आहेत. या संधीचा राजकीय लाभ उठवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कंबर कसली असून आपण विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता तुम्ही मला वेळ आणि परवानगी द्यावी, मी माझं बहुमत सिद्ध करतो, अशी विनंतीच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.