लेबल लावून पूरग्रस्तांना मदत करतात, ते उपकार करतायेत असं भासवत आहेत – नाना पटोले

- Advertisement -
“राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्तांना मदत करताना लेबल लावून करत आहे. ते काय उपकार करत नाहीत. परंतु, उपकार करत असल्याप्रमाणे भासवत आहेत. आम्हाला फोटो, प्रसिद्धी काही नको आहे. मुस्लिम समाजाने ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे. अशा प्रकारे आदर्श घेण्याची गरज आहे.” अशी टीका अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकाला दोष देत आहेत. या दोघांविरूद्ध 302 चे गुन्हे दाखल करावेत यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती, पटोले यांनी यावेळी दिली.
Loading...
Related Posts
- Advertisement -
महत्वाच्या बातम्या –
Loading...
- काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक – प्रियांका गांधी
- टिकटॉकद्वारे साकारणार महाराष्ट्राच्या विकास कल्पना; युवक काँग्रेसचे तरुणाईंसाठी मोठे व्यासपीठ
- ‘मुख्यमंत्र्यांना जनाची नाही, तर मनाजी लाज असेल तर ‘या’ दोन नेत्यांचे राजीनामे घ्या’
- ‘कोल्हापूर ही अमित शहांची सासुरवाडी आहे; त्यांनी जास्त मदत करावी फक्त हवाई पाहणी करू नये’
- ‘विमानाची गरज नाही, फक्त लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्यावे’; राहुल गांधींचे प्रत्युत्तर
- नितीन गडकरी आज थोडक्यात बचावले; विमानात तांत्रिक बिघाड