‘महाविकासाआघाडी सरकार पाडून दाखवणारा तो लाल अजित पवारच आहे’ ; आठवलेंचा टोला

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सरकार पाडण्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे.

अजित पवार म्हणाले होते कि, ‘कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

यानंतर यावर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना यांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत,’ असा खरमरीत टोलाह आठवले यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा